श्रेयस अय्यरसह १४ खेळाडू बाहेर!

कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई,
14 players including Shreyas Iyer out टी-२० आणि एकदिवसीय मालिकांनंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष कसोटी क्रिकेटकडे लागले आहे. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेचा असून, दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने भारतीय संघासाठी तिचे महत्त्व अधिक आहे.या दौऱ्यात टी-२० मालिकेतील संघाच्या तुलनेत भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरसह १४ खेळाडू श्रीलंका दौऱ्यात दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे. वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव आणि रिंकू सिंग यांचाही संभाव्य संघात समावेश नसण्याची शक्यता आहे.
 
 

AAYAR 
 
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून श्रीलंका दौऱ्यासाठी अधिकृत संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, वृत्तानुसार २८ जुलै रोजी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापत किंवा फिटनेसच्या कारणामुळे या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. त्यामुळे नव्या आणि युवा खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.
 
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर, तर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल परिस्थिती लक्षात घेता भारतीय संघात फिरकी गोलंदाजांना अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या संभाव्य १५ सदस्यीय संघात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, रवींद्र पटेल, कृष्णा जैस्वाल, मानसीक गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड आणि सरांश जैन यांसारख्या खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत संघ जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.