अर्शदीप सिंगने नात्याला दिली कबुली जाणून घ्या कोण आहे 'ड्रीम गल'

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
arshdeep singh भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयपीएलदरम्यान त्याचे आणि समरीन कौरचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आले होते. त्यानंतरही दोघे सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत होते. मात्र, त्यांनी आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अर्शदीपने स्वतःच इंस्टाग्रामवर समरीनसोबतचे दोन फोटो शेअर करत त्याखाली ‘My Person’ असे कॅप्शन लिहिले असून, त्याद्वारे या नात्याला अधिकृत स्वरूप दिले आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
 

arshdeep singh 
अर्शदीप सिंग ज्या समरीन कौरला डेट करत आहे, ती मूळची जम्मू-काश्मीरची असून तिचा जन्म ७ सप्टेंबर १९९९ रोजी झाला. तिने पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बी.कॉम (ऑनर्स)चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. जरी तिला ही स्पर्धा जिंकता आली नाही, तरी त्यानंतर अनेक नामांकित ब्रँड्स आणि मॉडेलिंग प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स तिला मिळाल्या. याच माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रातही प्रवेश केला.
 
 
समरीनने केवळ मॉडेलिंगपुरते arshdeep singh स्वतःला मर्यादित न ठेवता अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. लोकप्रिय लीगल थ्रिलर वेब सिरीज ‘नेल पॉलिश’मध्ये तिने अर्जुन रामपालसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय रणवीर सिंगच्या ‘83’ या चित्रपटात तिने क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू (अम्मी विर्क) यांच्या होणाऱ्या पत्नी सिमरनची भूमिका साकारली होती. पंजाबी चित्रपटसृष्टीतील ‘सरदार जी 2’ या गाजलेल्या चित्रपटाचाही ती एक भाग होती. अभिनयासोबतच समरीन अनेक लोकप्रिय पंजाबी आणि हिंदी संगीत व्हिडिओंमध्येही झळकली आहे. जुबिन नौटियाल, बादशाह आणि गुरू रंधावा यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत तिने काम केले असून, ‘बावला’ आणि ‘तुझे भूलना तो चाहा’ ही तिची गाणी इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे तरुणांमध्ये तिची मोठी लोकप्रियता निर्माण झाली असून सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
 
 
दरम्यान, आयपीएल २०२६ arshdeep singh स्पर्धेदरम्यान अर्शदीप आणि समरीन यांच्या नात्याच्या चर्चांना अधिक जोर मिळाला. या चर्चांना सुरुवात एका स्नॅपचॅट पोस्टमधून झाली होती. त्या पोस्टमध्ये अर्शदीप एका तरुणीचा हात हातात घेतलेला दिसत होता. त्या हातावरील नेलपॉलिशवरून चाहत्यांनी ती समरीन कौरच असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर समरीन अर्शदीपसोबत आयपीएलदरम्यान प्रवास करतानाही दिसली. तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचेही पाहायला मिळाले. समरीनचे वय सध्या २६ वर्षे असून अर्शदीप सिंग २७ वर्षांचा आहे. दोघांमध्ये अवघ्या एका वर्षाचे वयाचे अंतर आहे.
अर्शदीप सिंगपूर्वी समरीन कौरचे नाव प्रसिद्ध यूट्यूबर आशिष चंचलानीसोबतही जोडले गेले होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या स्क्रीनिंगलाही ते एकत्र उपस्थित होते. त्यावेळी दोघांनीही अफवा फेटाळून लावत आपण केवळ चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर समरीनने वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्यातील संबंध तुटल्याचे सांगितले होते. तसेच आता ते मित्रही नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.