देओलचा खलनायक म्हणून दबदबा

तीन बिग बजेट सिनेमांपैकी दोन ठरले यशस्वी

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
bobby deol अभिनेता बॉबी देओलने ‘अॅनिमल’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन करत प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा छाप पाडली. या चित्रपटात त्याने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या भूमिकेनंतर बॉबी देओलच्या करिअरला नवी दिशा मिळाली असून, त्याच्याकडे मोठ्या बजेटच्या चित्रपटांची रांग लागली.
 

bobby deol villain roles after animal comeback box office report of bandar alpha and jan nayakan 
‘अॅनिमल’नंतर बॉबी देओलचे तीन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाच्या भूमिका साकारल्या. मात्र, यापैकी एका चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही, तर दोन चित्रपटांमधील त्याच्या खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली.अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद, इंद्रजीत सुकुमारन, जितेंद्र जोशी आणि ऋद्धी सेन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. सुमारे २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ ४.२२ कोटी रुपयांची कमाई केली.
 
 
यानंतर ३ जुलै २०२६ रोजी बॉबी देओलचा ‘अल्फा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. शिव रवैल दिग्दर्शित हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्रित चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शरवरी वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. बॉबी देओलने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली असून, अनिल कपूर, दिया मिर्झा आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुमारे १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
यानंतर त्याच महिन्यात bobby deol २३ जुलै २०२६ रोजी बॉबी देओलचा ‘जन नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. थलपती विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने तमिळ चित्रपटसृष्टीत त्याची मोठी चर्चा झाली होती. या चित्रपटातही बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसला. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने ९२.३५ कोटी रुपयांची कमाई केली.
‘जन नायकन’ या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत २१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बंदर’, ‘अल्फा’ आणि ‘जन नायकन’ या सलग तीन चित्रपटांमध्ये बॉबी देओलने खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी ‘बंदर’ला बॉक्स ऑफिसवर अपयश आले असले तरी ‘अल्फा’ आणि ‘जन नायकन’मधील त्याच्या खलनायकी अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे ‘अॅनिमल’नंतर बॉबी देओलचा खलनायक म्हणून निर्माण झालेला दबदबा कायम असल्याचे दिसून येत आहे.