विषबाधा प्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल

टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळा

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
food-poisoning : मेळघाटातील धारणी तालुक्याच्या टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
 
 
 
kl
 
 
 
टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींना शनिवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती अन्य प्रशासकीय विभागांसोबतच पोलिसांना सुद्धा मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलिसांची एक चमू आश्रमशाळेत, तर दुसरी धारणी ग्रामीण रुग्णालयात रवाना झाली तसेच एक चमू टेंम्बली येथील सेंट्रल किचनकडे रवाना करण्यात आली. उप जिल्हा रुग्णालयात ५० मुली व १९ मुले असे एकूण ६९ विद्यार्थी उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. रात्री ६९ मुला-मुलींपैकी ६८ जणांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना त्याच दिवशी रुग्णालयातून आश्रमशाळेत परत पाठविण्यात आले. केवळ एक मुलगी रुग्णालयात असून, ती देखील सुरक्षित आहे. दरम्यान, आश्रमशाळेतील अन्नाचे नमुने जप्त करण्यात करण्यात आले व पंचानामा करण्यात आला.
 
 
मुख्याध्यापक नीलेश भागवत यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी किचनचे मालक विजय बोथरे तसेच तेथील प्रतिनिधी सचिन सातपुते, स्वयंपाकी संदीपसिंग व त्याचे सहकारी महेश देसाई आणि आमेकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
याचप्रकारे बिजुधावडी, सावलीखेडा, सुसर्दा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुला-मुलींसोबत आशाच प्रकारची घटना घडल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्या ठिकाणी भेट दिल्यावर मुले-मुली सुखरूप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र तिथे सखोल चौकशी सुरू आहे. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी या प्रकारणात लक्ष ठेवून असून, एसडीपीओ माधव गरुड स्वत: तळ ठोकून आहेत.