नागपूर ,
Chairman, Gopal Bohre माजी नगरसेवक तथा माजी शिक्षण व झोन सभापती गोपाल बोहरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी वृक्षरोपटे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन, भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी नगरसेविका अश्विनी जिचकार, नगरसेविका निधी तेलगोटे, योगेश थापे, माधुरी इंदूरकर, शिला कहाते, स्वाती गुप्ता तसेच अजय डागा उपस्थित होते. वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
सौजन्य:विवेक मेंढी ,संपर्क मित्र