नवी दिल्ली,
crpf देशातील सर्वात मोठे केंद्रीय निमलष्करी दल असलेल्या सीआरपीएफच्या ८३ कंपन्या आणि त्याचे विशेष युनिट, आरएएफ, १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीत तैनात राहणार आहेत. या तैनातीमध्ये तीन संपूर्ण महिला कंपन्यांचाही समावेश असेल. सध्या दिल्लीत ५० सीआरपीएफ कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या दिल्ली पोलिसांना सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करतात.

कॉक्रोच पार्टी आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनांच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विनंतीनुसार निमलष्करी दलाच्या ४५ कंपन्यांच्या तैनातीला मंजुरी दिली. या कंपन्यांना २७ जुलैपर्यंत दिल्लीत राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अतिरिक्त सीआरपीएफ दल तैनात करण्यात येणार असून एकूण ८३ कंपन्या १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीत तैनात राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत अतिरिक्त सीआरपीएफ कंपन्या तैनात करण्याचा आदेश जारी करण्यात आला. हिंडन विमानतळावर सोळा कंपन्या दाखल झाल्या, ज्यात दहा सीआरपीएफ कंपन्या आणि सहा सीआरपीएफ कंपन्यांचा समावेश आहे. या सीआरपीएफ कंपन्यांना सर्व प्रकारची अत्याधुनिक दंगलविरोधी उपकरणे, ऑपरेशनल-स्केल शस्त्रे आणि दारुगोळा यांनी सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.