मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा

26 रक्तदात्यांनी केले रक्तदान

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी, 
blood-donation : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शेंबाळपिंपरी येथील चंदेल बाल रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
 

y27July-Shembalpimpari 
 
 
 
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 62 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित चंदेल यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
 
 
 
सर्व 62 रक्तदात्यांना चंदेल बाल रुग्णालयातर्फे रक्तदानाचे प्रमाणपत्र तसेच कॉलेज बॅग भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे रक्तदात्यांचा उत्साह अधिक वाढला. प्रमुख पाहुणे म्हणून गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मतीन पैलवान, हकीमोदिन सिद्दिकी, इम्रान पठाण, भाजपा मंडळ अध्यक्ष शैलेश मेटकर, भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी, गुणवंत देशमुख, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष कळमनुरी रवी भोजे यांच्यासह विविध समाजघटकांतील नागरिक, आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. शिबिरासाठी यशवंत क्लिनिकल लॅबचे संचालक गजानन मनवर यांनी पुढाकार घेतला. त्यांना महादेव तवर, सुमेर सिद्दिकी, शेख अजीम, शैलेश मंदाडे, रवी कांबळे, संदेश मनवर, ज्ञानेश्वर शिंदे, राधेश्याम देशमुख, प्रदीप हजारे, ऋषिकेश देशमुख, डॉ. शीकांत साखरे, सरला कांबळे आणि आम्रपाली मनवर यांनी सहकार्य केले.