नागपूर ,
Dnyaneshwar Temple, Bajaj Nagar सुरश्री प्रस्तुत 'वंदितो पदरज आपुले' या शीर्षकांतर्गत अभंग गायनाचा कार्यक्रम बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे, नेहा इंदूरकर, फाल्गुनी खोडे कुरझेकर आणि प्राची भट मुळे यांनी सुमधुर अभंग सादर करून रसिकांची दाद मिळविली.
कार्यक्रमाला संवादिनीवर राहुल मानेकर, तबल्यावर सारंग किल्लेदार व प्रमोद बावने यांनी सुरेल साथ दिली. छोटा टाळवादक माधव मुळे याने आपल्या तालज्ञानाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमाचे निवेदन संगीता तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापन मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश संगवई व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
सौजन्य:कल्पना वाराणशीवर ,संपर्क मित्र