नागपूर
Dr. Manjusha Tandekar अमरावती येथील डॉ. मंजुषा महेशकुमार तांडेकर यांच्या सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे सन २०२० पासून त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या कार्याची नोंद घेत वर्ल्ड इंग्लिश मॅगझिनने त्यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित केले असून, त्यांच्या कार्यावर विशेष लेखही प्रसिद्ध केला आहे. तसेच सन २०२७ मध्ये युनायटेड किंगडम (यूके) व लंडन येथे त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही मासिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. डॉ. तांडेकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.
सौजन्य:शंकर पहाडे,संपर्क मित्र