नवी दिल्ली,
government on alert भारत सरकारने काळा समुद्र आणि लगतच्या सागरी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांवरील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षाविषयक सूचना जारी केली आहे. येथे सुरू असलेल्या संघर्षामुळे या संपूर्ण क्षेत्रातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे, असे सूचनेत म्हटले आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या जहाजांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह सुरक्षेच्या गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे.
एप्रिल २०२६ पासून या जलमार्गांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले वाढले आहेत. त्यात पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. संघर्षग्रस्त भागांतून प्रवास करणाऱ्या किंवा तिथे कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय नागरिकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी अशी नोकरी स्वीकारण्यापूर्वी तेथील विद्यमान सुरक्षा धोक्यांचे सखोल मूल्यांकन करावे. जे नागरिक असे काम करण्याचा निर्णय घेतील, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि नमूद केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे, असे भारत सरकारने जारी केलेल्या एका सूचनेत म्हटले आहे.
खलाशांनी भरती करणाऱ्या संस्था आणि जहाज चालकांकडून जहाजाचा नियोजित मार्ग, थांबण्याची बंदरे, सुरक्षा उपाय, विमा संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती यांबाबत सविस्तर माहिती मिळवावी. रोजगाराच्या अटी लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी मानकांशी सुसंगत असाव्यात आणि त्यामध्ये वैद्यकीय उपचार, सुरक्षित स्थलांतर, मायदेशी परतणे व आपत्कालीन परिस्थितीत नुकसानभरपाई यांसाठी पुरेशा तरतुदींचा समावेश असावा, याची खात्री करावी, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये या क्षेत्रांत काम करणाऱ्या खलाशांना सल्ला देण्यात आला.
सरकारने खलाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी सतत संपर्क ठेवण्याचा आणि त्यांना आपल्या सागरी प्रवासाबाबत माहिती देत राहण्याचा सल्लाही दिला आहे. याव्यतिरिक्त, 'सागरी प्रशासन महासंचालनालय आणि भारत सरकारच्या इतर संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे, तसेच जहाज चालवणारे ऑपरेटर आणि सक्षम सागरी प्राधिकरणांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे नियमितपणे पालन करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. विशेषतः, भारतीय नागरिकांना ‘बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय’अंतर्गत असलेल्या सागरी प्रशासन महासंचालनालयने २३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अद्ययावत सुरक्षा सूचनेचा संदर्भ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूचनांचे पालन करा
सरकारने खलाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी सतत संपर्क ठेवण्याचा आणि त्यांना आपल्या सागरी प्रवासाबाबत माहिती देत राहण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी सागरी प्रशासन महासंचालनालय आणि भारत सरकारच्या इतर संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे तसेच जहाज चालवणारे ऑपरेटर आणि सक्षम सागरी प्राधिकरणांनी दिलेल्या सुरक्षाविषयक सूचनांचे नियमितपणे पालन करावे. विशेषतः, भारतीय नागरिकांना ‘बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय’अंतर्गत येणाऱ्या सागरी प्रशासन महासंचालनालयाने २३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अद्ययावत सुरक्षाविषयक सूचनेचा संदर्भ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.