श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागपूर,
guru purnima celebration तुळशीबाग, महाल येथील मुरलीधर मंदिर परिसरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) येथे बुधवार, २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
guru purnima celebration
 
सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर विशेष अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर स्वामी याग तसेच श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण होईल. सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर साखळी पद्धतीने वीणावादन करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता सामूहिक सत्यनारायण पूजन होईल. सकाळी १०.३० आणि सायंकाळी ६.३० वाजता महानेवेद्य आरती होणार असून, त्यानंतर आध्यात्मिक मार्गदर्शन व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सर्व भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: मुकेश साळवे  संपर्क मित्र