कारगिल विजय दिन साजरा

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Kargil Victory Day माजी वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान)च्या वतीने अजनी चौक येथील अमर जवान स्मारकावर कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ajay 
 
 
 
कार्यक्रमात बोलताना ब्रिगेडियर (नि.) सुनील गावपांडे यांनी विद्यार्थ्यांनी भारतीय सशस्त्र दलात दाखल होऊन मातृभूमीची सेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात तिन्ही दलांचे माजी सैनिक, विविध शाळांतील विद्यार्थी, नागरिक आणि मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंग कमांडर (नि.) एस. के. जैन होते. यावेळी ब्रिगेडियर (नि.) सुनील गावपांडे, कर्नल अभय पटवर्धन, ग्रुप कॅप्टन विजय हरदास, आर. व्ही. सिंह आणि निंभोरकर यांनी कारगिल युद्धातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. देशभक्तीच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:अजय गाडवे,संपर्क मित्र