बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी

अड्याळमेंढा शेतशिवारातील घटना

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागभीड
leopard attack उपवन क्षेत्र मिडाळा अंतर्गत जनकापूर येथील सुर्यभान कन्नाके या मजूरावर बिबट्याने अचानक हल्ला करुन जखमी केले. ही घटना सोमवार, 27 जुलै रोजी दुपारी 4 वाजताच्या अड्याळमेंढा शेतशिवारात घडली. सुर्यभान कन्नाके असे जखमी मजुराचे नाव आहे.
 


leopard attack injures farm worker in adyalmendha nagbhid chandrapur
सध्या जनकापूर परिसरात धान रोवणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही मजूर अड्याळमेंढा शेतशिवारात धान रोवणीच्या कामासाठी गेले होते. दरम्यान सुर्यभान कन्नाके हा मजूर शेताजवळ असलेल्या नाल्यामधे शौचास गेला होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत मजूराने आरडाओरडा केली असता अन्य मजूर धावून गेले. त्यामुळे बिबट पसार झाला. जखमी मजूराला उपचारासाठी नागभिड येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती कळताच उपवन क्षेत्र अधिकारी तावाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पगमार्कच्या सहाय्याने बिबट्याचा शोघ घेत त्याला अड्याळमेंढा परिसरातून हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान धान रोवणीच्या हंगामामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.