नागपूर,
Mahakali Nagar महाकाली नगर-१ येथील हनुमान मंदिर परिसरात रविवारी सामाजिक कार्यकर्ते आशिष काळे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, युवक व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांनी स्वीकारली. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. आशिष काळे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा उपक्रमात सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सौजन्य :देवराव प्रधान,संपर्क मित्र