शेतकऱ्यांना दिलासा राज्यात उद्यापासून पुन्हा मुसळधार

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra rain alert heavy rainfall बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, मंगळवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.या मुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
 

maharashtra rain alert heavy rainfall forecast as low pressure area becomes active 
बंगालच्या उपसागरात गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मंगळवारपासून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन दिवस, तळ कोकणासह कोकण किनारपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला असून, रायगड रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा तसेच ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत उणे १५ टक्के पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात १ जुलै ते २५ जुलै दरम्यान, सरासरीच्या उणे 3 टक्के पाऊस झाला.
 
 
महाराष्ट्रात पावसाचा टक्का घसरला
जुलै महिन्यात महाराष्ट्रभरात काही जिल्हे वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने हुलकावणीच दिली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत उणे ३३ टक्के कमी पाऊस झाला, तर विदर्भात २६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पावसाची नोंद झाली. तर कोकणात ४ टक्के पाऊस झाला. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीची नोंद होताना दिसते. यासाठी मान्सूनच्या प्रणालीमध्ये झालेले बदल यासाठी कारणीभूत असून एल निनो, ला निना यासारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते, प्रदूषण या सगळ्याचा परिणाम पावसावर होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.