महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले

खा. जैन यांचे प्रतिपादन : शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वाटप

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
गोंदिया
mahayuti government महायुती सरकारने नेहमीच शेतकरी, कष्टकरी तसेच माता-भगिनींच्या हिताला प्राधान्य दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही कर्जमाफी योजना त्यापैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. असे प्रतिपादन खासदार राजेंद्र जैन यांनी केले.
 

mahayuti government decisions benefit common people says mp rajendra jain during farmer loan waiver certificate distribution in gondia 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रविवारी 26 जुलै रोजी जवळच्या कटंगी कला येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था येथे पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक योगेश भाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक सुरेश टेटे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना खा. जैन म्हणाले की, कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून पात्र शेतकर्‍यांनी आपले ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ थेट मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी ठरणार असून यामुळे हजारो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असे सांगितले. प्रसंगी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खा. प्रफुल पटेल यांचे शेतकरी हिताच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाला प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, पूजा अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, बाबा पगरवार, सरला चिखलोंडे, मोहिनी वराडे, अखिलेश ठाकूर, अखिलेश सेठ, कीर्ती पटले, सदाशिव वाघाडे, गणेश लांजेवार, लिकेश चिखलोंडे, भाऊलाल रहांगडाले, मदन चिखलोंडे, रमेश गौतम, मंगल ठाकरे, केवल रहांगडाले, दिनेश तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक सहित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.