नागपूर,
Major Hemant Jakate English School मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स तसेच मेजर हेमंत जकाते इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या गजरात दिंडीत सहभाग घेत परिसर भक्तिमय केला.
यावेळी सनमार्ग नगर येथील एमआयटी गार्डनमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भक्ती, समता, शिस्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी मनीषा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मधुसूदन मुंडे, मुख्याध्यापिका शीला मुंडे, उपमुख्याध्यापिका भारती मानकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र