उभ्या कंटेनरला कारची जोरदार धडक; चालक जागीच ठार

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मालेगाव,
malegao accident जिल्ह्यातील मालेगाव शहरा जवळील अकोला नांदेड महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपा समोर वाशीम वरून मालेगाव मार्गे शिरपूर जाणार्‍या एका स्विफ्ट कारची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कार चालक जागीच ठार झाला आहे. सदर अपघात २७ जुलै रोजी पहाटे ३ वाजता घडला आहे.
 
 
malegao accident
 
 
याबाबत सविस्तर असे की, दीपक लक्ष्मण भांदूर्गे हे लग्न समारंभ आटोपून एम. एच. ३७ वी. ९८४० या कार ने शिरपूरकडे जात असतांना महामार्गावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने जबर धडक दिली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. या अपघाततात दीपक लक्ष्मण भांदुर्गे ( वय ३१ रा. शिरपूर जैन ) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक हा कार मध्ये अडकून होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्याचा मृतदेह कार मधून बाहेर काढला.malegao accident दीपक भांदुर्गे हे घरातील कर्ते होते. आई वडिलांना एकुलता एक मुलगा असलेल्या दीपक च्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे ट्रक उभे राहत असल्याने अशा अनेक अपघाताच्या घटना घडत असतांनाही पोलिस आणि परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.