पाटलांची बैठक ठरली आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
जालना
manoj jarange patil मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ जुलै रोजी आंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी त्यांनी आपल्या समर्थकांना संदेश दिला असून, सकाळी १० वाजता आंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
 

manoj jarange patil calls maratha reservation meeting on july 29 future strategy to be decided 
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या भेटीनंतर आता जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना २९ जुलै रोजी आंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी नुकतेच उपोषणाचे अस्त्र हाती घेतले होते. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यापूर्वी मे महिन्यात जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भर उन्हात उपोषण सुरू केले होते. त्यांनी उघड्यावर बाज टाकून त्यावर बसत आंदोलन केले होते. या उपोषणादरम्यान त्यांनी विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या.
ज्या मराठा manoj jarange patil  बांधवांच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमाणपत्रांना वैधता द्यावी, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी या प्रक्रियेचा आढावा घ्यावा आणि ५८ लाख नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर या मागण्यांवर चर्चा झाली होती.२९ जुलै रोजी आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या टीमकडून राज्यभरातील मराठा बांधवांना या बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे. या बैठकीला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेची सद्यस्थिती, आरक्षणाच्या मागणीबाबत पुढील भूमिका आणि आंदोलनाची रणनीती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ जुलैच्या बैठकीकडे सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.