नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Naxal-affected area उपजीविका या नागपूरातील अग्रगण्य सामाजिक संस्थेच्या वतीने अतिदुर्गम व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एओपी गोठणगाव, केशोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या तसेच अन्य शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.


237 
 
 
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून आयोजकांनाही मोठे समाधान लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस बांधवांचे तसेच सर्व आयोजकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
सौजन्य: सुहास खरे,संपर्क मित्र