नीट प्रकरणाची सुनावणी पहिल्याच दिवशी स्थगित

सीबीआयचे वकील पोहोचलेच नाही

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
neet-case-hearing नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या जलदगती न्यायालयाची सोमवारी पहिली सुनावणी होऊ शकली नाही. सोमवारच्या कामकाजादरम्यान सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे कोणतेही वकील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यानंतर, न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

neet paper leak 
 
neet-case-hearing राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने अभियोजन संचालकांना, पुढील कार्यवाहीत कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करून, नीट पेपरफुटी प्रकरणाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारी वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आरोपी असलेले विकास आणि दिनेश बिवल यांच्या जामीन अर्जांवरही सोमवारी सुनावणी होणार होती, परंतु सीबीआयच्या वकिलाच्या अनुपस्थितीमुळे त्यावरही सुनावणी झाली नाही.
neet-case-hearing या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 ऑगस्ट रोजी राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयात होईल. न्यायालयाने आशा व्यक्त केली आहे की, पुढील तारखेला अभियोजन पक्षाकडून सरकारी वकील नियुक्त केला जाईल आणि खटल्याची पुढील कार्यवाही होऊ शकेल.