निर्मल नगरीत आषाढी एकादशी उत्साहात

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Nirmal Nagari Umred Road उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टतर्फे देवशयनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासून हजारो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेला.

tu 
 
फळे, फुले व आकर्षक रोषणाईने मंदिराची सजावट करण्यात आली होती. भजन, कीर्तन व हरिनाम संकीर्तनात महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर भाविकांना साबुदाणा खिचडी, उपवासाचे लाडू, केळी व खोवा जिलेबीचा महाप्रसाद देण्यात आला. उत्कृष्ट नियोजनामुळे हा भक्तिमय सोहळा भाविकांसाठी संस्मरणीय ठरला.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र