पंढरपूर,
Wari आषाढी वारी आणि झुलींचा व्यापार हे शेकडो वर्षांचे नाते आहे. सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल असणारा बैलांच्या झुलीचा व्यापार आषाढी वारीत बहरतो. संपूर्ण भारतात केवळ पंढरपूर येथेच बैलांच्या अंगावर मिरवणाऱ्या, त्यांचे रूप खुलवणाऱ्या मनमोहक आणि आकर्षक झुली तयार होतात हे येथील बाजारपेठेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. पंढरपूर येथील झुलीच्या व्यापार आणि बाजारास १५० वर्षाची परंपरा आहे. झुली तयार करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. एक झूल करण्यासाठी आठ ते दहा कुशल कारागीर राबतात. पंढरपूर येथे वर्षभर झुली तयार करण्याचे काम सातत्याने सुरू असते.
मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, कर्नाटकातील शेतकरी आणि पशुपालक आवड आणि बजेटनुसार वारीत आवर्जून झुलीची खरेदी करतात. काही हौशी लोक झुलींवर विविध देवीदेवतांचे, कुलदैवत असलेल्या देवांची नावे डिझाईन करून घेतात. तसेच, पोळ्यासाठी लागणारे शेब्या, वाशिंग, इंगुळ, बेगड आदींचीही खरेदी केली जाते. अनेक व्यापारी वारी काळात तात्पुरती दुकाने मोक्याच्या जागा भाड्याने घेऊन आपले झुलीचे व्यवसाय थाटतात. रंगीबेरंगी, मनमोहक रंगांच्या झुली घेतात. आषाढी वारी काळात सर्व झुलींची दुकाने २४ तास उघडी असतात. विक्रीसाठी सज्ज असलेल्या झुली साधारणपणे नऊशे रुपयांपासून पाच हजारांपर्यंत त्यांच्यावरील कलाकुसर आणि आकर्षक रचनेवर झुलींची किंमत निश्चित होते. शिंपी समाजातील २५० घरांचा उदरनिर्वाह या झुलींच्या व्यवसायावर अवलंबून आहे.
पंढरपूरच्या अनोख्या आकर्षक झुलीची भुरळ चित्रपटसृष्टीलासुद्धा पडली. या झुलींची कलाकुसर ‘पिंजरा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात बघायला मिळते. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी स्वतः पंढरपूरच्या बाजारातून झूल खरेदी केली होती. शिवाय, दादा कोंडके यांच्याही अनेक चित्रपटात पंढरपूरच्या झुली वापरल्या आहेत. यंदाही झुलींची बाजारपेठ फुलली असून, चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आषाढी वारीला Wari आल्यानंतर शेतकरी वर्ग मोठ्या हौसेने आपल्या बैलांसाठी झुली घेऊन जातात, निसर्ग चित्र आणि देवदेवतांची चित्रे असणाऱ्या झुलींना विशेष पसंती मिळते. यांनी सांगितली. झुली घेताना नंदी बैल, हत्ती, मोर, चिमण्या, बदक, पोपट, कासव, मासा आदी चित्रे असलेल्या झुली मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ, श्री दत्त गुरु, हनुमान, श्रीराम, विठ्ठल रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज, श्री ज्ञानोबा माऊली, महादेव, श्रीकृष्ण यांचे छायाचित्रे असणाऱ्या झुलींनाही मोठी मागणी असते
झुलीचे व्यापारी राजेंद्र आणि निलेश सरवदे