आंदोलनानंतर पोलिस करताहेत ‘सोशल साफसफाई’

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
jantar-mantar-protest दिल्लीतील जंतर मंतरवर जवळपास महिन्याभरापासून सुरू असलेले आंदोलन संपले आहे. त्यामुळे देशातील आंदोलक कथित जेन झी स्वगृही परतले आहेत. पण, आता या आंदोलनाच्या खाणाखुणा पुसण्याच्या कामी दिल्ली प्रशासन आणि पोलिस एकवटले आहेत. जंतर मंतरवरील भिंतींवर करण्यात आलेली सृजनशीलता आता कर्मचारी साफ करत आहेत. तर दिल्ली पोलिसांनी देखील एक विशेष धडक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम समाज माध्यमांवर आहे.
 
delhi police
 
 
jantar-mantar-protest  दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जी समाज माध्यम मोहीम राबवली होती, त्यातील सर्व प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना याबाबत नोटीस बजावली आहे. अनेक व्हिडीओ आणि पोस्ट काढून टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
 
jantar-mantar-protest  पोलिसांचे विशेष पथक हे सर्व साहित्य शोधण्याचे काम करत आहे. यासंदभांत काही नवे कंटेंट टाकले जात असतील तर त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. यासंदर्भात समाज माध्यमांना संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.