नागपूर,
harihar junior college हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारशिवनी येथे आज नशामुक्ती अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम आणि आयुष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर आधारित लघुपट दाखविण्यात आले. या लघुपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाला रामटेक येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका ललिता, पारशिवनी येथील छाया, बीके मंगेश दादा, बीके राऊत दादा यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले. तर आभार व समारोप शाळेच्या पर्यवेक्षिका निंबाळकर मॅडम यांनी केला.
सौजन्य: ताराचंद चव्हाण, संपर्क मित्र