नागपूरच्या राहुल आत्रामची निवड

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नागपूर,
.Rahul Atram नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी नागपूरचा राहुल प्रकाश आत्राम याची प्रतिष्ठित लिनक्स फाउंडेशन एलएफएक्स मेंटरशिप प्रोग्राम २०२६ अंतर्गत रिस्क फाईव्ह एक्सटेंशन्स लँडस्केप प्रकल्पासाठी निवड झाली आहे.
 

rahul 
 
 
या कार्यक्रमांतर्गत राहुल आत्राम १२ आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय मेंटरशिपमध्ये सहभागी होणार असून क्लाऊड नेटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या ओपन सोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे. जगभरातून ४० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी अर्ज केले होते. त्यापैकी भारतातून १५० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात एसजीजीएसचा मूळ नागपूरचा विद्यार्थी राहुल आत्रामने स्थान मिळविले आहे. आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी प्रकाश आत्राम यांचा तो मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि अधिष्ठाता यांच्यासह नागपूरच्या अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र क्षेत्रातील विद्वानांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
सौजन्य:रवींद्र भुसारी ,संपर्क मित्र