मंदिरातील चोरी अत्यंत निंदनीय : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

हिंदू मंदिरे धार्मिक आचार्यांच्या ताब्यात द्या

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
चिपळूण
ramanandacharya narendracharya maharaj अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून हिंदू धर्मीयांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या गंभीर प्रकरणावर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी अत्यंत कठोर प्रतिक्रिया व्यक्त करत मंदिर व्यवस्थापनाबाबत मोठी मागणी केली आहे. राम मंदिरात झालेली चोरी अत्यंत निंदनीय असून, गोरगरिबांनी पै-पै जमा करून मंदिरासाठी दिलेला निधी अशा प्रकारे लुटला जाणे ही लोकांच्या भावनांवर मोठा आघात असल्याचे महाराज म्हणाले. या घटनेत पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी भक्तांच्या मनावर झालेली ठेच भरून निघू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 

ramanandacharya narendracharya maharaj demands hindu temple management by religious leaders after ayodhya temple theft 
सरकार कारवाई करेल आणि दोषींना शिक्षा होईल. मात्र, लोकांच्या भावनांना बसलेली ही ठेच कोणीही भरून काढू शकत नाही, असे ते स्पष्ट म्हणाले. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची मागणी पुढे करत म्हटले की, जशा मुस्लिम समाजाच्या मशिदी आणि ख्रिश्चनांच्या चर्च चालतात, तसेच हिंदूंची मंदिरेही त्यांच्या धार्मिक आचार्यांच्या ताब्यात असावीत. यासाठी शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य ramanandacharya narendracharya maharaj  आदींची एक समिती गठित करून मंदिरांचा कारभार त्यांच्याकडेच सोपिवण्यात यावा. शासन निधर्मीवादी असल्यामुळे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांची पुरेशी जाण नसते, आणि मंदिर व्यवस्थापनातील सरकारी हस्तक्षेपामुळे तसेच कर्मचारी व्यवस्थेमुळे अनेक त्रुटी व चुका होण्याची शक्यता वाढते. जर मंदिरं आमच्या ताब्यात आली, तर त्यांची धार्मिकता अधिक चांगल्या प्रकारे जपता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच देशातील शिक्षण क्षेत्रातील वाढत्या पेपरफुटी प्रकरणावरही कडक शब्दांत भाष्य केले. केवळ मंत्र्यांचा राजीनामा देऊन चालणार नाही, तर यावर अत्यंत कठोर कायदे केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांनी शेवटी सुनावले.