तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
go-sanman-aahvan-campaign : गोसंरक्षण व गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या ‘गो सन्मान आव्हान’ अभियानाच्या द्वितीय टप्प्याअंतर्गत सोमवार, 27 जुलै रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जिल्हाधिकाèयांना निवेदने सादर करण्यात आली. या निवेदनांद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे देशभर गोवंश हत्येवर संपूर्ण बंदी लागू करावी, तसेच गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे, अशी जनभावना शासनापर्यंत पोचवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातही विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 11 हजार नागरिकांच्या स्वाक्षèयांचे निवेदन जिल्हाधिकारी विकास मीना यांना सादर करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात यवतमाळ येथील दत्त मंदिरात आयोजित एक तासाच्या सामूहिक रामनाम धुनेने झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व गोभक्तांनी राष्ट्राची सुख-समृद्धी, शेतकèयांचे कल्याण आणि गोमातेच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर गोरक्षण आणि गायत्री परिवार यांच्या विद्यमाने भव्य व शांततापूर्ण दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो गोभक्त सहभागी झाले. त्यांनी गोसंरक्षण, नैसर्गिक शेती आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविला.
यावेळी सभेत विविध वक्त्यांनी सांगितले की, 21 व्या शतकातील विकसित भारताच्या निर्मितीत गोमातेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोमय व गोआधारित नैसर्गिक शेतीमुळे शेतकèयांचे उत्पन्न वाढू शकते, शेतीचा खर्च कमी होऊ शकतो, जमिनीची सुपीकता वाढू शकते तसेच पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळू शकते. शेतकरी समृद्ध झाला तर देशही समृद्ध होईल आणि त्या दिशेने गोसंवर्धन हा भक्कम पाया ठरू शकतो.
कार्यक्रमासाठी गो सन्मान आव्हान अभियानाचे जिल्हा प्रभारी राजू खंडाळकर यांच्या नेतृत्वात व्यापक जनसंपर्क व प्रभावी समन्वय साधण्यात आला. यावेळी राजेश्वर निवल, अजय मुंधडा, अमोघ वोरा, नेहा पट्टेवार, भारती जानी, अभिजित गुल्हाने, शैलेश देशकर, सीए निरंजन राठोड, मनोज औदार्य, गोविंद मोर, केतन मजेठिया, ज्ञानेश्वर सुरजुसे, घनश्याम बागडी, सीए अमित अग्रवाल, अविनाश धनेवार, ऋषभ वाधवानी, डॉ. संजय सांबजवार, किसन सिंघानिया, रामजीलाल शर्मा, अरुण भिसे, कुणाल पटले, रीता पटमासे, राजू तिडके, डॉ. सुरेश चौधरी, मनीष गुलवाडे, प्रदीप खराटे, दीपक बाजोरिया, विक्की शर्मा, शुभम मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गोभक्तांनी मोलाचे योगदान दिले.