केवळ भारताची नव्हे, ही सर्वांची लढाई

विद्यार्थी आंदोलनात ग्रेटा थनबर्गने खुपसले नाक

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
लंडन,
greta-thunberg : शिक्षण क्षेत्रातील अनियमिततेच्या मुद्यांवर कॉक्रोच पार्टीच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने नाक खुपसले आहे. ही केवळ भारताची नव्हे, तर सर्वांची लढाई असल्याचे वक्तव्य तिने केले. या आंदोलनात जनतेच्या ताकदीचा खरा अर्थ सांगण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.
 
 
 
greta-thunberg
 
 
 
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) लंडन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रेटा बोलत होती. विद्यार्थ्यांचा न्यायासाठीचा लढा आणि लोकशाही व स्वातंत्र्यासाठीचा व्यापक संघर्ष हा संपूर्ण जगाचा सामायिक लढा आहे. भारतीय विद्यार्थी चळवळीने आपल्या सर्वांना अभिमान वाटायला लावला आहे. निषेधासाठी एकत्र आल्यावर लोक काय साध्य करू शकतात, हे या चळवळीने दाखवून दिले आहे. तिने जनशक्तीचा खरा अर्थ उलगडून दाखवला आहे, असे ग्रेटा थनबर्ग म्हणाली. भारतीय विद्यार्थ्यांचा न्यायासाठीचा लढा आणि लोकशाही व स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा संघर्ष हा जगभरातील लोकांचा सामायिक संघर्ष आहे. सर्वांनी एकत्र येऊन भारताच्या समर्थनात उभे राहिले पाहिजे, असे ती म्हणाली.