नागपूर,
students create a rangoli ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत जीव्हीपी पॉइंट परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. तसेच स्वच्छतेचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी रेखाटली.
या उपक्रमाला नेहरूनगर झोनच्या सभापती सीमा ढोमणे, नगरसेवक गिऱ्हे आणि झोनचे विभागीय अधिकारी आनंद खोडसकर उपस्थित होते. ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अरुणा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
सौजन्य: अरुण कडू, संपर्क मित्र