नागपूर ,
Trimurti Nagar, stray dogs, त्रिमूर्ती नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने भटके कुत्रे मुक्तपणे फिरत असून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, तसेच रात्री उशिरापर्यंत भुंकणे आणि आपापसात भांडणे यामुळे नागरिकांची झोपही उडाली आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना विशेषतः या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत संबंधित महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सौजन्य:रवि वाघमारे ,संपर्क मित्र