नागपूर ,
University Staff राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितची ६२ वी वार्षिक आमसभा २६ जुलै रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली. यावेळी २०२६ च्या शैक्षणिक सत्रात गुणवंत ठरलेल्या सभासदांच्या पाल्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच २०२५-२६ या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या ६० कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता आत्राम, उपाध्यक्ष नितीन खरबडे, सचिव राकेश कोपुलवर, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रमणी सहारे तसेच संचालक मंडळातील दर्पण गजभिये, रितेश पुरकाम, विलास पंचम, शैलेश फुलझेले, रुपा हुड्डार, डॉ. राहुल खराबे आणि प्रदीप गोतमारे उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचारी रमेश मेहर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
सौजन्य:रमेश मेहर ,संपर्क मित्र