आमगावात विश्व हिंदू परिषदेचा दोन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
vishwa hindu parishad विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गावाहिनी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आमगाव येथील साई मंगलम लॉन येथे दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग उत्साहात पार पडला. 25 व 26 जुलै रोजी झालेल्या या अभ्यासवर्गात जिल्ह्यातील केंद्रीय, प्रांत, विभाग, जिल्हा तसेच सर्व प्रखंड समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी झाले होते.
 

vishwa hindu parishad two day training camp held in amgaon gondia with active participation 
अभ्यासवर्गाचा प्रारंभ भारतमाता व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सेवा, सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर मार्गदर्शन करत सध्याच्या सामाजिक परिस्थितीत संघटनेची भूमिका, कार्यकर्ता घडविणे, संघटन विस्तार, सेवा प्रकल्प, सामाजिक समरसता आणि हिंदू समाजाचे संघटन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या प्रशिक्षणात विविध बौद्धिक, संवादात्मक व प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांना संघटनेची कार्यपद्धती, शिस्त, नेतृत्व विकास, वेळेचे नियोजन, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रभावी पद्धती तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच जिल्ह्यात संघटन विस्तार आणि सेवा कार्यांना अधिक गती देण्यासाठी पुढील कार्ययोजनाही निश्चित करण्यात आली. समारोप प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी समाजहित व राष्ट्रहितासाठी अधिक सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी अभ्यासवर्गाची सांगता झाली. या अभ्यासवर्गाला जिल्हा व प्रखंड स्तरावरील प्रमुख पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.