यवतमाळ अर्बन बँक शाखा कळंबचा वर्धापनदिन उत्साहात

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
urban-bank-kalamb : तालुक्यात अतिशय नावारूपाला आलेली यवतमाळ अर्बन बँकेच्या कळंब शाखेतर्फे सोमवार, 27 जुलै रोजी आपला तिसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता बँकेचे विभागीय अधिकारी आनंद पांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडळ संघचालक सुरेश कठाळे होते. या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने ग्राहक वर्गसुद्धा उपस्थित होता.
 
 

y27July-Wardhapan 
 
 
 
या निमित्ताने आनंद पांडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, यवतमाळ अर्बन बँक ही एक व्यक्ती निर्णय घेत नाही. तर संपूर्ण संचालक मंडळ आणि प्रशासन संयुक्तपणे बँक हितार्थ निर्णय घेत असते.
 
 
कळंबची शाखा ही तालुक्याच्या विकासामध्येसुद्धा आपला हातभार लावणारी एक शाखा असून यवतमाळ अर्बन बँकेने या तालुक्याला मोठ्या स्वरूपात कर्जाचा पुरवठा करून बहुतेक व्यापारी वर्गाला व बेरोजगारांना रोजगार दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
प्रास्ताविकात शाखा व्यवस्थापक भैरवी वुईके यांनी, यवतमाळ अर्बन बँक कळंब शाखेच्या उत्तम प्रगतीमध्ये कळंब शहर तथा तालुक्यातील जवळपास 10 हजार ग्राहकांचा मोठा सहभाग असून त्यांच्या सहभागामुळेच ही शाखा तालुक्यात नावारूपाला आल्याचे सांगितले.
 
 
कार्यक्रमाचे संचालन बँकेचे कर्मचारी संतोष भोयर यांनी, तर आभारप्रदर्शन बँकेच्या कर्मचारी अनुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने व्यापारी वर्ग तथा ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाकरिता सुधाकर लोहकरे, संजय गेडाम, अंजली शेरजे, वृंदा कोमावार, रणजित सराटे, मनोज आढाळ, ठेव प्रतिनिधी उन्मेश आढाळ, प्रमोद उरकुडे, गणेश काळे, गजानन चांदोरे यांनी परिश्रम घेतले.