मुंबई,
A career boost for 4 zodiac signs ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदलांचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. २९ जुलै रोजी शुक्र आणि मंगळ यांच्यात केंद्र दृष्टी योग तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्र हा सुख, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो, तर मंगळ ऊर्जा, धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या विशेष स्थितीचा काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो, असा ज्योतिषीय अंदाज आहे.

- मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. आत्मविश्वास वाढण्यासोबतच रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते, तर व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत.
- सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीचे संकेत असून, व्यवसायातही चांगला नफा मिळू शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्यासोबतच जुन्या कर्जातून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
- कन्या राशीसाठी हा योग अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असून, कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
- तूळ राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना चांगले व्यवहार निश्चित करण्यात यश मिळू शकते, तर नोकरदारांना पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त होणारे प्रवास फायदेशीर ठरू शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळण्यासोबतच कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहू शकते. जमीन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.