पोलिस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीला तिरोड्यातून अटक

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
arrested in tiroda हुडकेश्वर पोलिसांच्या कस्टडीत असलेला कुख्यात गुन्हेगार पलिसांच्या हातावर तुरी देऊन सोमवारी सकाळी पळून गेला होता. त्या आरोपीला पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातून अटक केली. एक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
 
arrested in tiroda
 
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बुद्धनगरचा रहिवासी असलेला एक्का रामटेके हा ड्रग्स घेण्याच्या सवयीचा आहे. अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो विविध शहर, गावांमध्ये गुन्हे करतो. नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करून तो चोरी, घरफोडी करतो. गुन्हे शाखेने २० जुलै रोजी त्याला, त्याचा साथीदार आणि त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या उमरेडच्या सराफाला अटक केली होती. पोलिसांनी त्याला तीन दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
 
मानेवाडा हत्याकांडातील आरोपी ज्या लॉकअपमध्ये होते, त्याच लॉकअपमध्ये एक्कालाही ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्याने शौचालयात जाण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्याला बाहेरील शौचालयात नेले. पोलिसाचे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून त्याने पोलिस ठाण्यातून पलायन केले. ही घटना उघड होताच पोलिस हादरले.
 
शहरातील सर्व पोलीस स्टेशन, कंट्रोल रूम, मोबाईल पथके, डी. बी. पथके, बीट मार्शल व सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार यांना एक्का फरार झाल्याचे सांगून त्याचा तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो तिरोड्याला पळून गेल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी तिरोड्याला सापळा रचला. पोलिस उपविभागीय अधिकारी गजाजन गुल्हाणे आणि तिरोड्याचे ठाणेदार आहे.