कुमामोतो.
apan shaken by 7.1 magnitude earthquake जपानमध्ये मंगळवारी (२८ जुलै २०२६) सकाळी ७.१ रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपान हवामान संस्थेने (JMA) कुमामोतो प्रांतात भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती दिली आहे. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर प्रशासनाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.जपान हवामान संस्थेच्या माहितीनुसार, भूकंपानंतर सुमारे १ मीटर (३.२८ फूट) उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा आणि अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भूकंपानंतर जपान सरकारनेही त्वरित आपत्कालीन भूकंप इशारा जारी केला. दक्षिण जपानमधील क्यूशू बेटावरील अनेक भागांना या इशाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. कुमामोतो, नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाझाकी या प्रांतांमध्ये प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, संभाव्य त्सुनामी आणि इतर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.