मॉलमध्ये महिलेचे अश्लील फोटो काढण्याचा प्रयत्न

खरेदी करत असताना विकृत प्रकार; युवकाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांत गुन्हा

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
crime-news : शहरातील सिताबर्डीतील एका मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचे मोबाईलने अश्लील छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गोंदिया येथील मूळ रहिवासी असलेल्या राहुल दुधराम उके (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
crime-news
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तक्रारदार महिला रविवारी सायंकाळी साडेसात वाजता व्हरायटी चौकातील एका मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका दुकानात खरेदीसाठी गेली होती. ती लहान मुलांसाठी खेळणी पाहत असताना आरोपी राहुल उके तिच्या मागे येऊन उभा राहिला. यावेळी आरोपीने महिलेच्या नकळत तिच्या मागे बसत मोबाईल फोन तिच्याकडे फिरवून अश्लील छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच ती हादरली. गर्भवती असल्यामुळे या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर पीडित महिलेने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राहुल उके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्यातील डेटा, छायाचित्रे तसेच इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे.