वाॅशिंग्टन,
constant use of ai is dangerous आजच्या काळात माणूस माणसाशी संवाद साधण्यापेक्षा चॅटबॉटशी संवाद साधणे पसंत करतो. हा एआय चॅटबॉट्स केवळ माणसांच्या प्रश्नांची उत्तरेच देत नाहीत, तर आपल्या सवयी, वर्तन आणि खाजगी जीवनाबद्दल आपण अंदाजही लावू शकत नाही, अशी अनेक माहिती गोळा करतात. त्यामुळे ‘एआय’चा सतत वापर करणे व्यक्तीसाठी धोकादायक असल्याचे काही बाबींवरून उघड होत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने चॅटजीपीटी आणि जेमिनीला त्याच्याबद्दल काय जाणतात, असे विचारले. तेव्हा मिळालेल्या उत्तराने तो थक्क झाला. मी कधीही चॅटबॉट्ससोबत खूप खाजगी माहिती शेअर केली नाही. मुलांची खरेदी, घराची दुरुस्ती किंवा डॉक्टरांशी होणारे संभाषण यांसारखी मर्यादित माहितीच दिली, पण जेव्हा मी काही विशिष्ट प्रॉम्प्ट्सद्वारे विचारले, तेव्हा चॅटबॉट्सनी अशा गोष्टी सांगितल्या ज्या मी कधीही थेट सांगितल्या नव्हत्या. त्यांनी माझ्या उत्पन्नाचा अंदाज त्या जर्मन कारवरून लावला, ज्याच्या दुरुस्तीबद्दल मी अनेकदा प्रश्न विचारत असे. मागील एका वर्षात पायाच्या अंगठ्याच्या दुखण्याबद्दल आणि त्याच्या उपचारांशी संबंधित प्रश्नांच्या आधारावर, त्यांनी दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्येचे संकेत दिले.
एआय चॅटबॉट्स संभाषणाच्या आधारावर एखादा जवळचा मित्र, पत्नी किंवा पालक जाणतात, तितकी माहिती गोळा करू शकतात. जगभरात कोट्यवधी लोक इंटरनेट शोध, काम आणि आरोग्यविषयक सल्ल्यासाठी चॅटबॉट्सचा वापर करत आहेत, परंतु अनेक लोकांना हे माहीत नाही की एआय त्यांच्याबद्दल काय-काय जाणतो. याच कारणामुळे चॅटबॉट्सच्या प्रायव्हसी आणि मेमरी सेटिंग्सकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर ॲप किंवा वेबसाइटमध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. चॅटजीपीटी ॲप किंवा वेबसाइटमध्ये सेटिंग्सवर जा. त्यानंतर मेमरी पर्याय उघडा आणि इनेबल मेमरीचा स्विच बंद करा. यामुळे चॅटजीपीटी नवीन संभाषणासाठी तुमची माहिती लक्षात ठेवणार नाही. जेमिनीच्या सेटिंगमध्ये जाऊन पर्सनल इंटेलिजन्स उघडा. येथे मेमरीचा पर्याय मिळेल. हे बंद केल्यावर जेमिनी तुमच्या संभाषणाच्या आधारावर वैयक्तिक माहिती साठवणे आणि तिचा वापर करणे थांबवेल.
चॅटबॉट्स हे जाणून घेत आहेत
उत्पन्न आणि आर्थिक स्थिती - खरेदी, वाहन किंवा इतर प्रश्नांच्या आधारावर ते तुमच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावतात.
आरोग्यविषयक समस्या - उपचार किंवा आरोग्याशी संबंधित प्रश्नांवरून जुनाट किंवा सध्याच्या समस्यांचा अंदाज लावतात.
व्यक्तिमत्त्व आणि वर्तन - तुमच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून संशय, नियंत्रण आवडणे यांसारख्या प्रवृत्तींचा निष्कर्ष काढतात.
जीवनशैली आणि वर्तन - संभाषणाच्या पॅटर्नवरून जीवनशैली, वर्तन आणि विचारांशी संबंधित पॅटर्नचा अंदाज लावतात.