महिला सशक्तीकरणासाठी सहल

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Halba Mahila Mandal हलबा समाज महिला मंडळातर्फे महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने वाघविले (उमरी) येथे सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, सुमारे ५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.महिलांमध्ये परस्पर परिचय, सामाजिक बांधिलकी, हलबी बोलीभाषेचे संवर्धन, व्यवसायाविषयी संवाद तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून एक दिवस स्वतःसाठी वेळ देण्याचा संदेश या सहलीतून देण्यात आला.
 
shal
 
 
या सहलीचे आयोजन लाईफ-लाईन सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा समाजसेविका रेखा निमजे विदर्भवादी आणि हलबा समाज महिला मंडळाच्या सदस्या अर्चना हेडाऊ यांनी केले. उपक्रमासाठी ललिता नंदनकर, अर्चना वाकोडीकर, सारिका निनावे, यू. अनिता हेडाऊ, शैलजा रामटेककर व मिना उमरेडकर यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य:अशोक माटे ,संपर्क मित्र