नागपूर,
Hanuman Temple Shankarnagar शंकरनगर येथील श्री हनुमान मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळी विवेक दाणी गुरुजी यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.
यानंतर मूकबधिर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दिंडीचे स्वागत व पालखी पूजन करून भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी भक्तीसुधा भजन मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले, तर संध्याकाळी रामरक्षा, मारुती स्तोत्र व हनुमान चालीसा पठणानंतर हभप नेहा रामेकर-इंदूरकर यांचे कीर्तन झाले.युवा रांगोळी कलाकार पूजा बोडखे यांनी साकारलेल्या विठ्ठल-रुख्मिणीच्या आकर्षक रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंकरनगरवासीयांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल मंदिर कार्यकारिणीने आभार व्यक्त केले.
सौजन्य:महेश मोळकर,संपर्क मित्र