मुंबई,
Mrunal-Yashavi date each other बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील नातेसंबंध नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आले आहेत. सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल यांच्याबाबत अशाच चर्चा रंगल्या आहेत. मुंबईतील वांद्र्यातील एका कॅफेमधील दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कथित नात्याबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यशस्वी जायस्वाल कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहेत, तर मृणाल ठाकूर आत असल्याचे दिसते. मात्र या फुटेजमध्ये दोघे एकमेकांशी संवाद साधताना किंवा एकत्र वेळ घालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत नाही. तरीही अनेक फॅन पेजेसनी हा व्हिडिओ शेअर करत दोघांमध्ये विशेष संबंध असल्याचा दावा करणारे कॅप्शन दिले, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना वेग आला.
मात्र, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच या अफवांवर मृणाल ठाकूर किंवा यशस्वी जायस्वाल यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.२४ वर्षीय यशस्वी जायस्वाल अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करताना दिसले. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यांनी शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर ते भारतीय संघातील महत्त्वाच्या युवा फलंदाजांपैकी एक बनले आहेत. डावखुरा सलामीवीर असलेला जायस्वाल इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. दुसरीकडे, अभिनेत्री मृणाल ठाकूर नुकत्याच वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्यासोबत 'हाय जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात झळकल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या आणि यशस्वी जायस्वाल यांच्या कथित नात्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.