तभा वृत्तसेवा
वणी,
nirguda-river : वणी विधानसभा मतदारसंघातील निगुडा नदीचा राज्याच्या महत्त्वाकांक्षी वर्धापैनगंगा नदी जोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला दिनकर पावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वणी विधानसभा मतदारसंघ हा वर्धा व पैनगंगा नदीच्या भौगोलिक परिसराशी निगडित असून, निगुडा नदी या दोन्ही नद्यांशी जोडण्याची मोठी क्षमता आहे. निगुडा नदीचा नदी जोड प्रकल्पात समावेश झाल्यास परिसरातील सिंचन व्यवस्थेत लक्षणीय वाढ होऊन वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुक्यातील हजारो शेतकèयांना त्याचा लाभ होईल.
या भागातील बहुतांश शेती आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून कापूस, तूर आणि सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. अपुèया सिंचन सुविधेमुळे शेतकèयांना दरवर्षी उत्पादनात घट व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. नदी जोड प्रकल्पामुळे ही परिस्थिती बदलून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास पावडे यांनी व्यक्त केला आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 1 लाख 44 हजार 302 हेक्टर शेतीक्षेत्राला या प्रकल्पाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विविध नदी जोड प्रकल्प राबविले जात असल्याने, त्याच धर्तीवर निगुडा नदीचाही वर्धापैनगंगा नदी जोड प्रकल्पात समावेश करून संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. या मागणीला वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांचा व्यापक पाठिंबा असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.