मुंबई,
Priyanka's followers bhijit Deepke नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली ३६ दिवस आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर ते मागे घेण्यात आले. या आंदोलनाला देश-विदेशातून विविध स्तरांवर पाठिंबा मिळाला होता. त्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश होता. आता प्रियांका चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांना फॉलो करण्यास सुरुवात केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या घडामोडीनंतर अनेकांनी विविध तर्क मांडले असून, यामागे एखादा सामाजिक उपक्रम, डिजिटल मोहिम किंवा अन्य प्रकल्प असू शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
प्रियांका चोप्रासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्रीने अभिजीत दीपके यांना फॉलो केल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी त्यावर टीकाही केली. एका वापरकर्त्याने "वाह प्रियांका" अशी प्रतिक्रिया दिली, तर अन्य काहींनी तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी मात्र कोणत्यातरी आगामी सहकार्याची किंवा समान विचारसरणीची शक्यता व्यक्त केली.या संपूर्ण घडामोडीवर अद्याप प्रियांका चोप्रा किंवा अभिजीत दीपके यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.यापूर्वीही प्रियांका चोप्राने CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा उल्लेख करत तिने प्रतिक्रिया व्यक्त केली होती.या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये प्रियांका चोप्रा, प्रकाश राज आणि हुमा कुरेशी यांच्यासह शबाना आझमी, वीर दास आणि कोंकणा सेन शर्मा यांसारख्या कलाकारांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.