आषाढी एकादशीनिमित्त भजन स्पर्धा

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Ramkrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे आषाढी एकादशीनिमित्त भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने झाले.
 

nar 
 
 
स्पर्धेत विद्यार्थिनींनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या अभंगांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांना भक्तिरसाचा आनंद दिला. संगीत विभागप्रमुख प्रा. सचिन देशमुख यांनीही अभंग सादर केला.यावेळी प्रा. झगडे यांनी आषाढी एकादशीचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व सांगत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जपणूक होण्यास अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. मारोती वाघ, संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य:सायली लाखे /पिदळी, संपर्क मित्र