वर्धा,
samagra-shiksha-abhiyan : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणार्या समग्र शिक्षा अभियानात कार्यरत ६८ कर्मचार्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. वेतन वितरणात सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे कर्मचार्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचारी विद्यार्थी संख्येची नोंद तयार करणे, यू-डायस पोर्टल अद्ययावत ठेवणे, नवीन शैक्षणिक सत्रापूर्वी पाठ्यपुस्तके व विद्याथ्र्यांच्या गणवेशासाठी निधीचे वितरण करणे, विविध अहवाल तयार करणे तसेच शाळाबाह्य मुलांची ओळख पटवून त्यासंबंधीची माहिती संकलित करणे आदी कामं करतात. मात्र, काही महिन्यांपासून वेतनाचे नियमित वितरण होत नसल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे.
दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने घरखर्च भागविणे कठीण झाले असून, अनेक कर्मचार्यांवर बँक कर्जाचे हप्ते भरण्याची वेळ आली आहे. काहींना कुटुंबातील ज्येष्ठांच्या उपचारांचा तसेच इतर अत्यावश्यक खर्चांचा ताण सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेकदा वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे तसेच दर महिन्याला वेळेत वेतन मिळेल, याची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.