नागपूर,
Sevasadan Teachers College सेवासदन शिक्षण संस्था संचालित श्रीदेवी पद्मावती सेवासदन अध्यापक विद्यालयात संस्थेच्या शतसंवत्सरी वर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी १०० तुळशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव वासंती भागवत व सहसचिव साधना हिंगवे यांच्या हस्ते तुळशी रोपण करून झाले. यावेळी त्यांनी तुळशीचे औषधी, पर्यावरणीय व सांस्कृतिक महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यालय परिसरात १०० तुळशी रोपांची लागवड करण्यात आली. उपक्रमात प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
सौजन्य: बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र