बोगद्यात 'वंदे भारत' अडकली; प्रवाशांची धडधड वाढली!VIDEO

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
कसारा,
vande-bharat-express-stuck : मुंबईहून नांदेडच्या दिशेने धावणारी 'वंदे भारत एक्सप्रेस' कसारा घाटातील एका बोगद्यात अचानक खोळंबल्याची घटना घडली आहे. रेल्वेच्या ओव्हरहेड विजेच्या वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तसेच विजेचा पुरवठा खंडित झाल्याने ही हायस्पीड ट्रेन बोगद्यातच थांबली, ज्यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला.
 

VANDE  
 
 
 
ओव्हरहेड वायर तुटल्याने अपघात टळला
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कसारा घाट पार करत असताना अचानक ओव्हरहेड इलेक्ट्रीक वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि वीजपुरवठा बंद झाला. चालकाने तत्परता दाखवत गाडी बोगद्यातच सुरक्षितपणे थांबवली. मात्र, बंद बोगद्यात ट्रेन थांबल्याने आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याची भीती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
 
 
 
 
 
 
रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल
 
घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक आणि आपत्कालीन मदत पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
 
वाहतूक विस्कळीत
 
घाटात वंदे भारत एक्सप्रेस खोळंबल्यामुळे या मार्गावरील इतर रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. दुरुस्तीचे काम पूर्ण करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत.