सोनेगाव पोलिस ठाण्यात घुसले पाणी

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
sonegaon-police-station : शहरात झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळ परिसरातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे थेट सोनेगाव पोलिस ठाण्यात पाणी शिरले, तर शेजारील सोनेगाव वाहतूक शाखेच्या कार्यालयात तब्बल पाच फूट पाणी साचल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. हीच स्थिती गेल्यावर्षीसुद्धा होती. मात्र, पोलिस प्रशासनाने त्यावर कोणताही तोडगा काढला नाही.
 

sonegaon-police-station 
 
 
 
अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सोनेगाव पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहून काम करावे लागले. कार्यालयातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धावपळ करावी लागली. दरम्यान, पोलिस ठाणे आणि वाहतूक कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या अनेक वाहनांमध्ये पाणी शिरले. परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले. सोनेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत तारेवरची कसरत सुरु होती.