यवतमाळ-माहूर-किनवट रेल्वेमार्गाला त्वरित मंजुरी द्या

खा. प्रतिभा धानोरकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
pratibha-dhanorkar : विदर्भ आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या प्रदेशांना थेट जोडणाèया तसेच यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, धार्मिक आणि शेतीप्रधान भागाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक ठरणाèया यवतमाळ-आर्णी-हिवरा-माहूर-किनवट या नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आगामी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. या मागणीवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले.
 
 
y28July-Pratibha
 
 
 
यावेळी सादर केलेल्या निवेदनात खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, यवतमाळ, आर्णी, हिवरा, माहूर आणि किनवट परिसरातील लाखो नागरिक मागील अनेक वर्षांपासून रेल्वे सेवेपासून पूर्णपणे वंचित आहेत. योग्य रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे येथील शेतकèयांना आपला कृषी माल मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेळेत पोचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
 
 
हा रेल्वे मार्ग साकार झाल्यास शेतकèयांच्या उत्पादनांना सुलभ बाजारपेठ उपलब्ध होईल आणि वाहतूक खर्च कमी होऊन बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळेल. या प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामीण तरुणांसाठी उच्च शिक्षण, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन संपूर्ण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळेल.
 
 
विशेष म्हणजे, माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्रीरेणुकादेवीचे पवित्र स्थान आणि भगवान श्रीदत्तात्रेयांचे प्रसिद्ध धाम असल्याने दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या नव्या रेल्वेमार्गामुळे देशभरातून येणाèया भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होईल, ज्यामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल.
या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करून रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचे तांत्रिक सर्वेक्षण, मंजुरी व प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करून आगामी रेल्वे अर्थसंकल्प व विकास योजनांमध्ये या प्रकल्पाचा अंतर्भाव करावा, अशी आग्रही विनंती खा. प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.